‘आता माझ्या विरोधात काही बोललात तर…’, चित्रा वाघ विरोधात संजय राठोड आक्रमक

मुंबई | ऑगस्ट क्रांतीदिनी (09 ऑगस्ट) रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी शिंदे यांच्या गटातील नऊ आणि भाजप यांच्या गटातील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली.

यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे (Pooja Chavan Suicide Case) आरोप झाले होते.

त्यावेळी त्यांच्याविरोधात भाजपने मोठे आंदोलन केले होते. संजय राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. आता त्यांना परत एकदा मंत्री केल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

संजय राठोड जरी मंत्री झाला, तरी मी त्याच्याविरोधात असलेला माझा लढा सुरु ठेवणार आहे. येवढे आरोप आणि एका मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरुन देखील, त्यांना मंत्रिपद दिले हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे वाघ म्हणाल्या होत्या.

यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पक्षाच्या नेत्यांना पत्र पाठवून त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे आवाहन केले आहे. यावरुन आता राठोड यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राठोड म्हणाले, मला पोलिसांनी क्लिन चीट दिल्यानंतरच मी मंत्री झालो आहे. आणि ज्यावेळी माझ्यावर पूजा चव्हाण प्रकरणाचे आरोप झाले होते, त्यावेळी मी राजीनामा देखील दिला होता.

तसेच माझा आता त्या प्रकरणात काही संबंध नाही, तरी देखील कोणी माझ्याविरोधात काही बोलत असेल, तर त्यांच्याविरोधात मला कायदेशीर पाऊल उचलावे लागेल, असे राठोड यांनी म्हंटले आहे.

लोकशाहीत सर्वांना बोलण्याचे अधिकार आहेत. माझ्यावर झालेले आरोप आता पुसले गेले आहेत हे पाहावे. मी त्यांना निर्दोष असल्याची कागदपत्रे पाठविणार असल्याचे राठोड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

केंद्र सरकारची “हर घर तिरंगा” योजना वादात; वरुण गांधींचा मोंदींना घरचा आहेर…

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, महत्वाची माहिती समोर…

नवीन मंत्रिमंळावर किशोरी पेडणेकर आक्रमक; केली आरोपांची मालिका…

“नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी आमनेसामने येणार?”

“महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना लफडी बाहेर काढली आणि आता मंत्रिपदं दिली”