मुंबई | लोकांना जगायचे आहे , पण दारू ही जगण्याची संजीवनी नाही. लोकांना कोरोनावर ‘लस’ हवी आहे. दारू म्हणजे अशा प्रकारची ‘लस’ नाही. दारू दुकाने म्हणजे लस संशोधन केंद्र नाही. सरकारने घेतलेला निर्णय तूर्त बरोबर आहे. 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार ‘कोरोना संक्रमण’ विकत घेणे परवडणारे नाही. संकटाचे भान ठेवा, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
दोन दिवसांत 65 कोटींची दारूविक्री एकट्या मुंबईत झाल्याची बातमी आहे. 65 कोटींची दारू विकल्याने सरकारी तिजोरीत पाच-दहा कोटींची माया जमली असेलही, पण मंगळवारी एका दिवसात मुंबईत 635 नवीन कोरोना रुग्ण आढळले. साधारण तिसेक लोकांचा मृत्यू झाला, अशी आठवण राऊत यांनी करून दिली.
दारू दुकानांमुळे दोन दिवस रस्त्यांवर जो धिंगाणा घातला गेला, लोकांनी जो बेशिस्तीचा तमाशा केला तो पाहता सरकारला पुन्हा दारू विक्रीवर निर्बंध घालावे लागले. चेंबूर परिसरात मद्यपींनी रस्त्यावर धिंगाणा घातला. रस्त्यावरील गाडय़ांची तोडफोड केली. महिला व इतर निरपराध्यांवर हल्ले केले. पोलिसांना जुमानले नाही. त्यामुळे त्या भागात एकच गोंधळ उडाला. दारूविक्री परवानगीचे हे ‘साइड इफेक्ट’ फक्त चोवीस तासांत समोर आले. दारू म्हणजे कोरोनावरील ‘लस’ किंवा जालिम दवा नव्हे, हे दारूविक्री समर्थकांनी लक्षात ठेवले पाहिजे, असंही राऊत म्हणाले आबहेत.
मुंबईने कोरोनाग्रस्तांचा दहा हजारांचा उंबरठा पार केला आहे व काही लोक दारूची दुकाने उघडली म्हणून खूष आहेत. बाबांनो संकटाचे भान ठेवा, असा सल्ला त्यांनी त्यांनी मद्यप्रेमींना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”
-अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी
-आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे
-‘राज’पुत्राचा मुख्यमंत्र्यांना फोन; उद्धव यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद
-बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी