मुंबई | शिवसैनिकावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे अडचणीत आले होते. काही दिवस नितेश राणेंना तुरूंगात रहावं लागलं होतं. सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना पायपिट करावी लागली होती.
अशातच आता नितेश राणे बाहेर आल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल करत आहेत. किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक सामना जुंपला असताना नारायण राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
दिशा सॅालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेकडून विनायक राऊतांनी मोर्चा संभाळला.
विनायक राऊतांनी, राणेंना त्यांच्या वाढत्या वयामुळे आता कदाचित विस्मरण होत असेल किंवा मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना खूप मानसिक त्रास होत असेल, असा टोला लगावला होता.
त्यावर आता नितेश राणेंनी उत्तर दिलंय. संजय राऊत आणि विनायक राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी दिवसभर भुंकत असतात, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंचे कुत्रे आहेत, असं म्हणत नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.
2014 ते 2019 पर्यंत सावंत गृह राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कारवाई का केली नाही?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान, नितेश राणेंच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजकारण्यांच्या राजकीय शहाणपणावर प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या –
धनंजय मुंडेंची बॅटिंग पाहिली का?, 157च्या स्ट्राईक रेटनं खेचल्यात धावा; पाहा व्हिडीओ
“शिवाजी महाराज आहे आमचा लाडका राजा, एप्रिलमध्ये वाजवून टाकू ठाकरे सरकारचा बाजा”
सीमेवर लढताना अवघ्या 23 व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण; संपूर्ण देश हळहळला
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता कार्ड हरवलं तर…
“मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला डावलण्यात आलं, मी टरबुज्या म्हणणार नाही पण…”