‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…’; संजय राऊतांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | रविवारी भाजपचे मंत्री गिरिश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांचा विवाहसोहळा जामनेरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.

राज्यातील अती महत्वाच्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली. या लग्नाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.

यावेळी अमृता यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला असता नागपूरला गेल्यावर एक गोष्ट आवर्जून करण्याचा सल्ला त्यांनी राऊत यांना दिला होता.

संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर येतातय, असं म्हणत या पत्रकाराने अमृता यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अमृता यांनी, नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते, असं अमृता फडणवीसांनी म्हटलं.

अमृता फडणवीसांनी दिलेल्या सल्ल्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पक्षाचा विस्तार कोकण व्यतिरिक्त भागात झाला नाही, ही टीका होत असताना आता शिवसेनेनं पक्ष विस्तारासाठी तयारीला लागलीये.

विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करा असे आदेश पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर, शिवसेनेचे सर्व खासदार आता पुढचे तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! सर्वसामान्यांना महागाईचा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं 

‘कोरोना संपलेला नाही अजून…’, अमेरिकेतील दिग्गज डॉक्टराचा जगाला अत्यंत गंभीर इशारा 

राज्यातील ‘या’ भागात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता! 

“पंतप्रधानांना 2 तासही झोपू द्यायचं नाही, हे भाजप नेत्यांनी ठरवलंय” 

coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट