मुंबई | कालची मैदानावरची सभा ही ऐतिहासिक होती. जे टीक करताय त्यांची बुबूळं काल बाहेर आली असतील, अशी अतिविराट सभा होती. त्यामुळे या टीकेला काही फार महत्व द्यायची गरज नाही, असं प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिलं आहे.
कालची सभा ही मराठवड्याच्या जनतेसाठी होती. कालची सभा जे देशात अनेक प्रश्न आहेत, अडचणी आहेत त्याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे, हे सांगण्यासाठी होती. कालची सभा काश्मिरी पंडितांचा जो आक्रोश तिथे सुरू आहे, त्या आमच्या बांधवांना एक समर्थन देण्यासाठी, आधार देण्यासाठी कालची सभा होती, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
काश्मिरी पंडितांविषयी एक भूमिका घेतलेली आहे. आता यावर विरोधकांनी टीका करावं असं काय आहे? पण महाराष्ट्रात सध्या विरोधासाठी विरोध हे जे धोरण विरोधकांनी अवलंबलं आहे, त्यामुळे विरोधी पक्षाचाच भविष्यामध्ये सत्यानाश होणार आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, कालच्या सभेच उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि सरकार पडल्यावर मीच पुन्हा येणार. मात्र सरकारला अडीच वर्ष झाली. प्रशासनाचा काडीचा अनुभव नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री, महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेतोय, असं सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवासांवर निशाणा साधला आहे.
एक जमाना होता की देशाच्या कानाकोपर्यात शिवसेना-भाजप राजकारणात अस्पृश्य होतो, कारण हिंदुत्ववादी. 25-30 वर्षे तुम्हीं आमचा उपयोग करुन घेतला आणि सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली?, अशी टीका त्यांनी भाजपवर केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार
“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे
हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे