मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एवढी विकासाची कामे केली. मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन केलं. ते त्यांनी दिसलं नाही का? त्यावर राज ठाकरे एक शब्दही का बोलले नाही?, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
भाजप आणि आमच्यात काय झालं हे आम्ही पाहू. तुम्ही तुमचं पाहा, असं सांगतानाच काल शिवाजी पार्कात भाजपचाच भोंगा वाजत होता. स्क्रिप्टही भाजपचीच होती आणि टाळ्या, घोषणाही भाजपच्याच स्पॉन्सर्ड होत्या, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
तुम्हाला एवढं उशिरा कसं आठवलं? थोडसं आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अक्कल दाढ एवढी उशिरा कशी येते? त्याचा आता अभ्यास करावा लागेल. अडीच वर्षानंतर बोलत आहात. भाजप आणि शिवसेनेत काय झालं ते आम्ही पाहू. तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही आत यायची. आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा, असं संजय राऊत म्हणालेत.
भोंग्याचं काय करायचं? तुमच्या भोंग्याचं काय करायचं? यांच्या भोंग्याचं काय करायचं? त्यासाठी सरकार समर्थ आहे. भाजप शासित राज्यात किती भोंगे हटवले ते सांगा? असा सवाल राऊतांनी केलाय.
भाजप त्यांची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढत आहे. पण त्यावर आम्ही फार बोलणार नाही. आमचा दृष्टीकोण विकासाचा आहे. राज्य पुढे न्यायचं आहे, असं राऊत म्हणालेत.
राज्यात संकटं येतात त्यावर मात करून पुढे जायचं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची घुसखोरी सुरू आहे, त्याविरोधात लढायचं आहे. हे करत असताना शिवसेनेचा भगवा फडकावायचा आहे, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका; मसाल्यांसह ‘या’ वस्तू महागल्या
UPA च्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘…तर मी राजकारण सोडेन’; जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज
“शरद पवारांवर टीका केल्या शिवाय यांना हेडलाईन मिळत नाही”
“भाजपची एकट्याची डाळ शिजत नाही, म्हणून मनसे त्यांची बी टीम बनलीये”