औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या भाषणाच्या आधी शिवसेना नेते संजय राऊत यांचं भाषण झालं. यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल, असं राऊत म्हणालेत.
महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर भ्याड हल्ले होत आहेत. मागील 2 महिन्यात काश्मीरमध्ये 27 काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलंय, अशी टीकाही राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू”
“…तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही”
लेडी सचिनचा क्रिकेटला अलविदा; मिताली राजची निवृत्तीची घोषणा
“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”
“पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीसांनी आणि मी खूप प्रयत्न केले पण…”