‘त्या डायरीतील भाजप नेत्यांची नावं जाहीर करा’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली आहे.

‘मातोश्री’ला 50 लाखांचं घड्याळ पाठवलं, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचं म्हटलं आहे.

आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचं वाटप केल्याचा दावा त्यांनी केला.

यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काही वर्षांपूर्वी जैन डायरी तसेच बिर्ला डायरी उघड झाली होती. या डायरींमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांची नावे होती. ही नावे जाहीर करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

जाधव यांची डायरी जर विश्वासार्ह असेल तर यापूर्वी आलेल्या जैन डायरी आणि बिर्ला डायरी सुद्धा विश्वासार्ह मानून त्यात नमूद असलेल्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

एका डायरीला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, ही दुटप्पी भूमिका मान्य नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबेना; सलग सहाव्यांदा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल महागलं 

“भारतातील हिंदू मुली मुस्लिम मुलांना घेऊन जातात, त्यामुळे…” 

सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव 

पुढील 5 दिवस ‘या’ भागात उष्णतेची लाट; हवामान खात्याकडून अलर्ट जारी  

…अन्यथा पैसे मिळणार नाहीत; शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी