खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ

नाशिक | ‘राजकारणातील मैत्री आणि मैत्रीतलं राजकारण’ (Politics) महाराष्ट्राने अनेकदा पाहिलं आहे. राजकारणातील बातम्या आपण दररोज ऐकत असतो. कोण कोणावर आरोप करतो. तर कोण कोणाला टोले लगावतो.

मात्र, याच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया रचला असं म्हटलं जातं.

यशवंतरावांचे सर्व पक्षातील नेत्यांसह सलोख्याचे संबंध आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एकप्रकारचे संस्कार लाभले आहेत. राजकारणाच कितीही कट्टर विरोधक असला तरी पडद्यामागे नेत्यांचे चांगले संबंध असतात.

असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये दिसून आला आहे. दररोज एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, प्रविण दरेकर आणि चंद्रकांत पाटील मनसोक्त गप्पा मारताना पहायला मिळाले.

भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी यावेळी हजेरी लावली होती. त्यावेळी हे सर्व नेते गप्पा मारताने पहायला मिळाले.

या लग्न कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नेते चर्चा करत होते. तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांना दिलखुलास गप्पा मारताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.

देवेंद्र फडणवीस ज्यावेळी कार्यक्रमात पोहोचले त्यावेळी संजय राऊतांनी सोप्यावरून उठून फडणवीसांच्या हातात हात दिला.

तर संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील (Sanjay Raut, Chhagan Bhujbal, and Chandrakant Patil) या तीन पक्षातील नेत्यांनी सोफा देखील शेअर केल्याचं पहायला मिळालं. तिन्ही पक्षातील नेते एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. आपल्या संस्कृतीत असे प्रसंग घडतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

कुटुंबातील पाच भाऊ भांडतात. वेगळं राहतात, वाटण्या देखील करून घेतात, मात्र लग्नकार्याच्या प्रसंगी सर्वजण एकत्र येतात, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”

घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा

समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला 

‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल 

“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ”