उद्धव ठाकरे अस्वस्थ, त्यांना अशाप्रकारच्या राजकारणात रस नाही- संजय राऊत

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती जागा लढवायच्या यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीत तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही असताना काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मोठा पेच तयार झाल्याचं दिसतंय. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकं घरामध्ये बंद आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. अशावेळी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकमताने एक निवडणूक घेऊ शकत नाही हे महाराष्ट्राच्या परंपरेला कलंक लावणारं चित्र असेल. उद्धव ठाकरे यांना अशाप्रकारच्या राजकारणात कधीही रस नव्हता आणि नाही. ते या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ही निवडणूक बिनविरोध झाली तरच लढावी अशी त्यांची इच्छा आहे. निवडणुका लढायला आम्ही घाबरत नाही. पण ही वेळ निवडणुका लढण्याची नाही. सध्याची वेळ कोरोनाची परिस्थिती हाताळण्याची आहे. आपण नाईलाज म्हणून ही निवडणूक घेत आहोत, असंही राऊतांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य अस्थिर होऊ नये म्हणून आम्ही स्वतः पंतप्रधानांशी चर्चा करुन ही निवडणूक घेत आहोत. याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, असं मत संज राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये, अन् 3 पक्षांचं सरकार कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त”

-“भारत कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”

-“महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही”

-लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?

-मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा