मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचं पहायला मिळत आहे.
अलिबागमधील 19 बंगल्यांवरुन किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तरही दिलं आहे. मात्र यावरुन गेल्या तीन दिवसांपासून राऊत-सोमय्या वाद शिगेला गेल्याचं पहायला मिळत आहे.
आज किरीट सोमय्या कोर्लई गावात जाणार आहेत. उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या 19 बंगल्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी उद्या आम्ही कोरलाई गाव अलिबागला भेट देणार आहोत, असं ट्विट करत सोमय्या रवाना झाले आहेत.
किरीट सोमय्या कोर्लई दौऱ्यावर रवाना झाले असताना आता पुन्हा एकदा राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपचे लोकं मराठी माणसांना संपवू पाहत आहेत. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत आणि आता तेच त्या जमिनीवर जात आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.
पुढे राऊत म्हणाले की, त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? तो चोर आणि लफंगा आहेत, सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहे तर भाजपच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे.
किरीट सोमय्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. आता पाहत राहा, त्यांचा खेळ खल्लास झालाय. ते जे पळत आहेत ते जेलच्या दिशेने पळत आहेत, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी सोमय्यांना लक्ष केलं आहे.
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बाप आणि बेटे जेलमध्ये जातील असा इशारा दिला. तसंच किरीट सोमय्या हे काही नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता दिसत आहे.
सोमय्या यांच्या दौऱ्यानंतर आता आणखी कोणता नवा वाद उभा राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली होणार असल्याचं पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी
‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”
येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा
राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू