अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय- संजय राऊत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अयोध्येतील राम मंदिराबाबत निवेदन दिलं आहे. यावेळी बोलताना अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं जाणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं कर्तव्यच होतं, असा टोला संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना देण्यात आली आहे. यानंतर आज लोकसभेत नरेंद्र मोदींनी राम मंदिराबाबत निवेदन दिलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-67एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा

-एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही- उद्धव ठाकरे

-पवारांना हिंदूविरोधी म्हणनाऱ्यांना आव्हाडांनी धरलं धारेवर

-ओवैसीसुद्धा एक दिवस हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-“देशाला आज गांधीजींसारख्या नेत्याची गरज भासतीय”