“सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसतं, जे घडतं ते रक्तरंजित असतं”

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपने आपलं वर्चस्व स्थापन केलं. महाविकास आघाडीला मोठा धक्का देत भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

सिंधुदुर्गातील निकालानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सिंधुदुर्गात जे घडतं ते रक्तरंजित असतं, असा घणाघात सामनातून करण्यात आला आहे.

श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर हे राजकीय नरबळीच आहेत. हे नरबळी कसे गेले यासाठी केंद्रीय गृहखात्याने एखादी एसआयटी नेमायला हवी, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने सिंधुदुर्गात याच दहशती हल्ल्यांचा पुरेपूर स्वाद घेतला आहे. पण हेच लोक खाटीकखान्यात बसून प्रवचने झोडत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.

सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसते. जे घडते ते रक्तरंजित असते. हा इतिहास एकाच व्यक्तीभोवती फिरत असतो, अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात बँकेवरील वर्चस्वासाठी खुनाखुनी झाली व जिल्ह्यातील आमदारांना पलायन करावे लागले. याची नोंद इतिहासात राहिल, अशी टीका देखील भाजपवर केली आहे.

एका जिल्हा बँकेवर विजय मिळवताच राज्यात सत्ता परिवर्तन होईल अशी बोंब मारणे यास भाकडकथा नाही म्हणायचे तर दुसरे काय?, असा खोचक सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

मानगुटीवर बसलेली भुते उतरवणारे निष्णात लोकही त्याच कोकणात आहेत. हे काय भाजपवाल्यांना माहीत नाही?, अशी टीका देखील शिवसेनेने सामनातून केली आहे.

जिल्हा बँक राण्यांनी जिंकली हे सत्यच आहे. आता जिल्हा बँकेचा आणि महाराष्ट्राच्या सत्तेचा काही संबंध आहे काय? असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाची ‘ही’ दोन नवीन लक्षणं आली समोर; दिसताच लगेच टेस्ट करुन घ्या!

मेहबूबाला पाठीवर घेऊन चालला होता तरूण अन् पुढे भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

“वाजपेयींची गाडी मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे वापरली, मोदीजींनी 7 वर्षांत 4 गाड्या बदलल्या”

कोरोना कधी संपणार?; WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं

लहान मुलांच्या लसीकरणासाठी शाळा सज्ज; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेणार तातडीची बैठक