‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच आता…’, संजय राऊतांची खोचक टीका

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. शिंदेंनी 35 समर्थक आमदारांना सोबत घेत बंड केल्यानंतर आता शिवसेना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.

शिवसेनेनं एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर सेना विरूद्ध एकनाथ शिंदे वाद आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बातचीत केली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांची तक्रार केल्याचं समजतं. संजय राऊत फोनवर चांगलं बोलतात मात्र प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या या तक्रारीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी खोचक शब्दात एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

अडीच वर्ष सत्तेचा मलिदा ज्यांनी चाखला तेच लोक आता बोलत आहेत, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. या वक्तव्याचा नेमका अर्थ काय याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असून यामुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना संजय राऊत अग्रस्थानी होते. तर शिवसेनेनं भाजपसोबत युती करावी असा एकनाथ शिंदेंचा आग्रह होता.

दरम्यान, संजय राऊतांनी खोचक शब्दात टीका केली असून एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे पुढे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल

“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार

‘शिवसेनेच्या आमदारांना किडनॅप करून नेलं’, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या ‘या’ अटी!