अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले…

मुंबई | देशात सध्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा मुद्दा गाजत आहे. देशातील अनेक भागातून केंद्राच्या योजनेला विरोध करण्यात येत आहे.

केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार प्रहार केला आहे. हा भारतीय सैन्यदलाचा अपमान असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेवरून उत्तर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

सैनिक कधीही कंत्राटीपद्धतीने घेतले गेले नसल्याचं राऊत म्हणाले. देशाची सुरक्षा ज्यांच्यावर आहे त्यांच्यासोबत हे असं कसं होऊ शकतं, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

हा भारतीय सैन्य दलाचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा अपमान असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. तर मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे, अशी खोचक टीकाही राऊतांनी केली.

आधी अच्छे दीनचे स्वप्न दाखवले आणि आता काय तर अग्निपथ काढले आहे. भारतीय सैन्याची प्रतिष्ठा आहे ती रसातळाला जाईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सैन्यात एक शिस्त असते. मात्र, सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती होणार, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बिचुकलेंचं एकच लक्ष, आता राष्ट्रपतीपद फक्त; लवकरच उमेदवारी अर्ज भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं शंभरीत पदार्पण; मोदींनी पाय धुवून आशीर्वाद घेतले

सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणाऱ्या हॉटेलवाल्याबाबत राजू शेट्टींचा मोठा खुलासा, म्हणाले…

मोठी बातमी! वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आमदारांना नातेवाईक, मित्रांसोबतदेखील न बोलण्याचा आदेश

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंचा रूग्णालयातील फोटो समोर!