नाशिक | जी लोकं माझ्या अंगावर येतात त्यांना मी नेहमी सांगतो. तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मी फाटका माणूस आहे, असं म्हणत शिवेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
उर्जा युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मुलाखतीत राजू परूळेकर यांनी संजय राऊत यांना बोलतं केलं. यावेळी राऊतांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.
मी स्वतःला शासन बनलं त्याचा शिल्पकार मानत नाही. मी फाटका माणूस आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार व्हावं ही देशाची राज्याची गरज होती. लोकांच्या मनातही तेच होतं, असं राऊत म्हणाले.
सुरुवातीला शिवसेना बार्गेनिंग पावर वाढवत आहेत असं म्हटलं गेलं. मात्र, मला आणि शरद पवारांना याबद्दल विश्वास होता. शरद पवार यांना जास्त विश्वास होता. भाजपचा विश्वास संपला होता, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-सरकारचा रिमोट पवारांकडे तर रिमोटची बॅटरी सोनिया गांधींकडे; फडणवीसांची टीका
-जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर; 100 जीबी डाटा मिळणार मोफत
-गुरूला पद्मश्री मिळाल्याने शिष्याचा आनंद द्विगुणीत! म्हणतो….
-पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे- नितीन गडकरी
-गेले 13 वर्ष लतादिदी मला ‘पद्मश्री’ मिळावा म्हणून प्रयत्न करत होत्या- सुरेश वाडकर