“अहो, कोथरूडचे उपरे पाटील….. शरद पवारांना संकटकाळात जाग असतेच”

मुंबई |   निसर्ग वादाळाचा तडाखा बसलेल्या कोकणच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कोकण दौऱ्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे.

शरद पवारांना आता जाग आली का? असा उटपटांग सवाल चंद्रकांत पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात. शरद पवारांना आता जाग आली का, हा त्यांचा सवाल आहे. शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. संकटकाळात महाराष्ट्राचे सरकारही जागेच आहे, पण विरोधकांचा धृतराष्ट्र झाला त्याला काय करायचे?, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

कृषी क्षेत्र हाच ज्यांच्या राजकारणाचा आत्मा आहे त्या शरद पवारांना तरी शेतीविषयक सल्ले कोणी देऊ नयेत. वाजपेयींपासून आज मोदींपर्यंत प्रत्येकजण अशा प्रश्नी पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेत आले आहेत, पण पाटील व त्यांचे लोक ‘पवारांना आता जाग आली काय? असे विचारून एकप्रकारे वाजपेयी-मोदींचा अपमान करत आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“पवारांनी 2 दिवसांत धोबीपछाड दिल्याने 6 महिने झाले भाजपवाले झोपलेच नाहीत”

-रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटनांवर राजेश टोपे म्हणाले…

-‘या’ गरीब देशानंही स्वतःला जाहीर केलं कोरोनामुक्त, सारं जग झालंय हैराण

-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

-तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?- देवेंद्र फडणवीस