Top news महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकार 11 दिवसही टिकणार नाही, असं म्हणणार्‍यांचं बारावं घालून सरकारने 6 महिने पूर्ण केले”

मुंबई |  राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिम्मत दाखवावी, महाराष्ट्रात नाही. ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असे बोलणार्‍यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपचा जोरदार समचार घेतला आहे. तसंच राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या विरोधकांना राज्यपालांनी खडेबोल सुनावायला हवेत, असं ते म्हणाले आहेत.

कोरोनाचे संकट नसते व सर्व काही आलबेल असते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते, पण आता सरकारचे सर्व लक्ष कोरोनावर लढण्यावर आहे, असा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. अशा बोंबा ठोकल्याने सरकारचा बालही बाका होणार नाही. विरोधी पक्षाचे सध्या 105 चे बळ आहे, ते कायम राहावे, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत, पण सरकारचे 170 आहेत, त्याचे दोनशे झालेच तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये, असा इशारा देखील राऊत यांनी आजच्या अग्रलेखाच्या माध्यमातून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बिनकामी माणसं सरकार पाडण्याचा विचार करतात, पवारांचा फडणवीसांवर निशाणा

-‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

-विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

-“नारायण राणे शिवसेनेमुळे मोठे झाले अणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”

-माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…