मुंबई | दहशतवादी अफजल गुरू, बुऱ्हान वाणीचं समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती या कधीकाळी भाजपच्या मैत्रीण होत्या. मेहबुबा यांच्या पार्टीचे चारित्र्य नेहमीच फुटीरतावादी, काश्मीरच्या समर्थनार्थ राहिलं आहे. त्यानंतरही भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्ता उपभोगली, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
काश्मिरी पंडितांवर त्याच काळात हल्ले झाले. आता त्याच मेहबुबा मुफ्ती काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करावी म्हणतातयत. या मेहबुबा मुफ्ती यांना भाजपनेच बळ दिलं आहे. शिवसेनेने नेहमी या विचारधारेचा विरोध केला, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर खरा हिंदुत्ववादी कोण, यावरून या दोन्ही पक्षात चढाओढ लागली आहे. मात्र, मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत भाजपने जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेली युती आणि उपभोगलेली सत्ता यावरून शिवसेनेने नेहमीच भाजपवर तोंडसुख घेतलं आहे
मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 पैकी 22 तास काम करतात, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे. आता म्हणे मोदी यांना ती 2 तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झोप उडेल, असा टोला राऊतांनी पाटलांना लगावलाय.
द काश्मीर फाइल्स चित्रपटावरून सध्या देशभरात राजकारण सुरूय. त्यानंतर आता त्याचा उल्लेख करत आज राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
यशवंत जाधवांच्या अडचणी वाढल्या; आयकर विभागाला सापडलेल्या डायरीने खळबळ
काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला मोठा झटका; न्यायालयानं सुनावली ‘इतक्या’ वर्षाची शिक्षा
“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांना सांगणार आहे”
“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात”