“केंद्र सरकारनं अख्खा देश उद्योगपतींना विकला”

मुंबई | शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारनं अनेक सार्वजनिक उपक्रम विकले आहेत. अख्खा देशच विकला आहे आपल्या मर्जीतील उद्योगपतींना, अशी टीका राऊतांनी केली आहे.

तुम्ही गरीबांच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार होते. तुम्ही अनेक योजना घोषित केल्या. त्यासाठी तुम्ही देश विकला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

सात वर्षात केंद्र सरकारनं देश विकला एअर इंडिया राहिली होती, ती देखील विकली. आता देशात विकण्यासारखंही काही राहिलेलं नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊतांनी यावेळी बोलताना किरीट सोमय्यांवर देखील निशाणा साधला आहे. आयएनएस विक्रांत हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. आयएनएस विक्रांतच्या पै न पैचा हिशोब घेतला जाईल, असं राऊत म्हणालेत.

कुणी बाहेर येऊन बडबड केली तरी फरक पडणार नाही. या संदर्भात लवकरच पोलिस कारवाई करतील. माझा हा हवेतील गोळीबार नाही, आम्ही पुराव्यासह बोललो आहेत, असंही त्यांनी म्हटंलय.

दरम्यान, 2024 ची तयारी आतापासून सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही नागपूर दौऱ्यावर जाणार आहोत. नागपुरात शिवसेना वाढवणार असल्याचंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘पाच कोटी द्या, अन्यथा…’; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी

“देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय” 

Kieron Pollard Retirement: 6 चेंडूवर 6 षटकार खेचणाऱ्या कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबच्या फलंदाजांचे लोटांगण; 9 गडी राखत दणक्यात विजय

पिंपरी-चिंचवडचे डाॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली!