Top news देश

देवेंद्र फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अध:पतन बघवत नाही- संजय राऊत

सिल्वासा | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. NCB अनेक प्रकरणं उघड केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झालं? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे, असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचं होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे. ते सिल्वासामध्ये माध्यमांशी बोलत होते.

तपाण यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे. स्वत: मुख्यमंत्री तेच सांगत आहेत. महाराष्ट्र सरकार आलं नाही याचा राग काढला जात आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, कुणापुढे झुकणार नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.

गेल्या काही काळात एनसीबीनं अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झालं ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असं राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावर परसेप्शन ठरत नाही. आमच्या दलालीवर बोलता, आम्ही तोंड उघडले आणि दिल्लीतील आणि महाराष्ट्रातली पाच वर्षांची, गुजरातची 20 वर्षे तर दलाली काय याचा खरा अर्थ देशाला कळेल. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

गांजा ओढणाऱ्या बाबांनाही तुरूंगात टाका- रामदास आठवले

धक्कादायक! स्टेजवर बोलत असतानाच काँग्रेस नेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’; चित्रा वाघ यांचं मलिकांना प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“नवाब मलिकांचं दुःख वेगळं आहे, ते स्पष्टपणे समोर येतय”