“कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये”

मुंबई | भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीये. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला आणि शांततेला चूड लावायची आहे. त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आहेत. त्यामुळे एसटी कामगारांनी भाजपच्या हातचे बाहुले बनू नका, असं आवाहन संजय राऊतांनी कामगारांना केलं आहे.

महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या बऱ्याचश्या मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. त्यांनी स्वत:चं, कुटुंबाचं, एसटीचं आणि महाराष्ट्राचं हित पाहावं, असं आवाहन हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आजचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावेत असे आहेत. त्यामुळे कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असंही संजय राऊत म्हणालेत.

अनिल परब यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. त्यामागे राजकारण आहे. पुतळे जाळण्याचं राजकारण सुरू आहे. ते कोण आहेत? त्यांचा राजकीय अजेंडा काय आहे?, असा सवालही राऊतांनी केलाय.

एसटी विलीनकरण करावे अशी त्यांची मागणी आहे. पण एसटीचं विलीनिकरण होणं अजिबात शक्य नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारच म्हणाले. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हा व्हिडीओ अर्धवट नाही. पूर्ण आहे. पण त्यांची भूमिका तीच आहे. आता मात्र, भाजपमधील हौशेगवशे, उपरे नाचत आहेत. त्यांच्या नाचण्याने प्रश्न सुटत असतील तर सुटावेत, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.

भाजपला हाराष्ट्राच्या शांततेतेला चूड लावायची आहे. त्यासाठी त्यांनी कामगारांच्या घराच्या होळ्या करायचं ठरवलं असेल तर कामगारांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणालेत. त्यासाठी त्यांनी कामगारांच्या होळ्या करायचंय ठरवलं असेल तर कामगारांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या टीकेला सुधीर मुंनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या मतदारसंघांत एक कार्यकर्ता आला होता. त्यांनी मला निवेदन दिलं होतं. मतदार म्हणून तुम्ही इथले आमदार आहात तर भूमिका घ्या, विलीनीकरण तुम्ही करू शकता का? पण विलीनीकरण अर्थ खातं करू शकत नाही. त्यासाठी परिवहन विभाग आणि एसटीचा प्रस्ताव लागतो. तो अर्धवट व्हिडिओ दाखवला आहे. तिथे मला कुणीही शिष्टमंडळ घेऊन आला नव्हता, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मी आजही सांगतो की मी विलीनीकरणाच्या बाजूने आहे. अर्थमंत्री म्हणून एसटीला सर्वात जास्त मदत मी केली आहे. तो कॅपिटल कर आहे त्यासंदर्भात मदत केलीये, असंही मुनगंटीवार म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या 

 ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’ 

‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत