मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ल्याला मी आंदोलन म्हणत नाही. यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो. महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं आहे, असं काही अस्वस्थ आणि अतृप्त आत्मे महाराष्ट्रात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहेत, असंही ते म्हणालेत.
गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा आहे. विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यासाठी फंडिंग केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता. आता जे आंदोलक रेल्वे स्टेशनवर बसले आहेत, त्यांच्याकडे सर्वांकडे एकाच वेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसं काय? ही कोणती यंत्रणा आहे. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसत आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
कामगारांच्या मागण्याबाबत आमची संवेदना आहेच मात्र एक गट भरकटवून विरोधक सरकारविरुद्ध हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ते म्हणाले.
महाराष्ट्राली ही घाण साफ करावी लागेल आणि आता ती वेळ आली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर नाही तर विरोधी पक्षातील काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पैसे गोळा करून पचवले आणि ढेकर दिलीत, आता तुमचं ऑपरेशन करावं लागेल”
‘आमची माणसं गायब झाली’; आंदोलक कर्मचाऱ्यांचा खळबळजनक दावा
मुंबई पोलिसांचा किरीट सोमय्यांना मोठा झटका!
‘मी भारतातील लोकांना…’; इम्रान खान यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतुक