नागपूर | देशात होत असलेल्या ईडीच्या कारवायांवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ईडीच्या कारवायांबद्दल राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय. मध्यमवर्गीय व्यक्तीवर आक्षेप घेण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होतात. अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना इडीनं दिल्लीत बोलावलं. मी झुकणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले. हा राजकीय गैरवापर होतो, असं संजय राऊत म्हणालेत
भाजपचं राज्य नसणाऱ्या ठिकाणीचं ईडीची कारवाई होते. सात वर्षात तेवीस हजार धाडी पडल्या. महाराष्ट्र, बंगालमध्ये सत्ता पाडू, असं भाजपचं स्वप्न आहे. पण, आम्ही वाकणार नाही, मोडणारही नाही. आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
दहशत शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नाही. शिवसेना असाा पक्ष आहे, तिथे हे शब्द चालत नाही. खोटे आरोप करणं हा बॉम्ब आहे का?, असं ते म्हणालेत.
मी ईडीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं 13 पानी पुराव्यासह सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली आहे. तो बॉम्ब नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांना मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केलं आणि संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“जनाब संजय राऊत…तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच”
“माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”
“राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजे”
पेट्रोल डिझेलनंतर गॅस दरवाढीचा भडका; आता सिलेंडरसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
संस्कार, संस्कृती, सन्मान…; 125 वर्षीय स्वामी शिवानंदांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक