मुंबई : गांधी परिवाराला असलेला धोका कमी झाला आहे, असं गृहमंत्रालयास वाटतं म्हणजे नक्की कुणास वाटतं? असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
गांधी कुटुंबाच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकावर तसेच अमित शहा यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र वातावरण निर्भय असावं. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना बेडरपणे काम करता यावं असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण पंतप्रधान, गृहमंत्री, मंत्री आणि इतर सत्ताधारी पुढारी सुरक्षा ‘पिंजरे’ सोडायला तयार नाहीत व बुलेटप्रूफ गाडय़ांचे महत्त्व कमी झालेलं नाही, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
दरम्यान, गांधी परिवाराच्या सुरक्षा ताफ्यात जुन्या गाड्या पाठवल्याच्या बातम्याही चिंताजनक आहेत. धोक्याची घंटा वाजत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रतापराव चिखलीकर अजित पवारांच्या भेटीला; चर्चेला उधाण – https://t.co/l9bwUiJMBo @AjitPawarSpeaks @PratapPatil_PPC
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“कुणी कुणाशी युती करावी, हे सांगणं आमचं काम नाही” – https://t.co/gDjoYBKR01 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“मंत्रिमंडळ विस्तारात कोणतंही खातं मिळालं तर मी चांगलं काम करेल” – https://t.co/kuRprLP6LV @RealBacchuKadu
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019