मुंबई : शनिवारी महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठराव पार पडला. यावेळी हा ठराव 169 विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक ट्विट केलं आहे.
मजबूत होणे का मजा ही तब है, जब सारी दुनिया कमजोर करने पर तुली हो, असं ट्विट त्यांनी केलं आहे. यातून त्यांनी भाजपला चिमटा काढला आहे. विधानसभा निकाल लागल्यापासून राजकारणात अनेक ट्विट निर्माण झाले होते, मात्र, अखेर शिवसेना सत्तेत आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं जुळवून आणण्यात त्यांच्या मोठा वाटा आहे. त्यांच्याच प्रयत्नाने महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंंत्री मिळाला आहे.
दरम्यान, विधानसभा निकाल लागल्यापासून संजय राऊत यांनी सामना अग्रलेख, ट्विट आणि पत्रकार परिषदा घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेण्याचं सोडलं असलं तरी त्यांनी दररोज ट्विट करणे सुरुच ठेवले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 1, 2019
महत्वाच्या बातम्या-
प्रियांका गांधींचं मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र; म्हणतात…- https://t.co/2nk740mBe4 @priyankagandhi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
शरद पवार यांनी मनात आणलं तर कोणतीही उलथापालथ घडवू शकतात- संजय राऊत- https://t.co/gcLXBCmLxi @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
संजय राऊतांचं ‘ते’ भाकित खरं ठरलं! – https://t.co/pdf4GlCX7g @rautsanjay61 @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019