मुंबई | राज्यातील राजकीय हालचालींध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. सगळेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला पहायला मिळाला.
राज ठाकरेंनी काल केलेल्या झंझावती भाषणाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहे. अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना निशाण्यावर घेतलं आहे.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कलदाढ आली आहे. भाजप आणि शिवसेनेत काय झाले ते आम्ही दोघे पाहू. यामध्ये आम्हाला तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही.
राज ठाकरेंना कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती आणि सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढंच नाही त्यांना मिळणाऱ्या टाळ्या देखील स्पॉन्सर होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
भाजप आपली मळमळ राज ठाकरे यांच्या भोंग्यातून उतरवत आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम काम करत आहे. राज ठाकरेंना हे दिसलं नाही का? ते आपले मशीदेवरचे भोंगे उतरवतायेत, असं टीकास्त्रही संजय राऊ यांनी सोडलं.
उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या नेत्यांना जनता धडा शिकवेल, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलेला पहायला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस
Skin Care | उन्हाळ्यात दह्याचे ‘हे’ फेसपॅक वापरा आणि मिळवा तजेलदार त्वचा!
इम्रान खान यांच्यानंतर पुढचा पंतप्रधान कसा निवडला जाईल?, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका; मसाल्यांसह ‘या’ वस्तू महागल्या