महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेची अमित शहांवर टीका, म्हणाले…

मुंबई | चीनच्या मुद्द्यावर चर्चांना घाबरत नाही. चीन संबंधावर १९६२ पासून आपण संसदेत बोलायला तयार आहोत, असं शहा यांनी जाहीर केलं. विसरा तो भूतकाळ. पंडीत नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही तुम्ही १९६२ सालात काय सांगताय?, असा सवाल करत शिवसेनेनं गृहमंत्री अमित शहांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

रोगाशी लढावं रोग्यांशी लढून देशाचा पैसा आणि वेळ वाया घालवू नये, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान कोरोना आणि चीनविरूद्धच्या लढाया जिंकणार आहे, असं अमित शहा यांनी सांगितलं. त्यांनी या लढायांवरच आपलं लक्ष केंद्रीत करावं, असा सल्ला शिवसेनेनं शहांना दिलाय.

सरकारने आणि अमित शहांनी विरोधी पक्षाकडे लक्ष देऊ नये. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नांनी इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेनेनं सामनातून शहांना लगावलाय.

दरम्यान, चीनच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपली आहे. काँग्रेसकडून हा मुद्दा उचलून धरला जात असताना आता दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू’, कराचीतून फोन आल्याचा संशय

-लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा

-शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप, म्हणाले….

-राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत

-गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….