Sanjay Raut: “आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन”

मुंबई | ईडीनं आज संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अलिबागमधील प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी पहायला मिळत आहे.

संजय राऊतांवर झालेल्या कारवाईनंतर आता भाजप नेत्यांनी संजय राऊतांना धारेवर धरलं आहे. त्यावेळी राऊतांवर टीका देखील करण्यात आली आहे. अशातच आता संजय राऊतांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्या मागे ईडी लागणार, सीबीआय लागणार मला पूर्ण कल्पना होती, असं संजय राऊत म्हणाले आहेत. माझ्यावर दबाव येतोय, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

सुडाचे राजकारण, बदल्याचं राजकारण, तुमचं सरकार माझ्या प्रयत्नामुळे आलं नाही, हे सरकार पडत नाही म्हणून मला अडकवत असाल तर जरूर अडकवा, असं खुलं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.

यातील एक आरोप जरी सिद्ध झाला, तर मी राजकारण समाजकारण सोडेन, उरलेली प्रॉपर्टी भाजपच्या नावावर करेन, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, माझा पक्ष शिवसेना आणि मला असलेलं लोकांचं समर्थन ही माझी संपत्ती आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. सरकारला धोका निर्माण व्हावा यासाठी संजय राऊतांनी गुडघे टेकावे असं त्यांना वाटतंय, असंही राऊतांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL मध्ये अंडरटेकरची एन्ट्री! अय्यरने थेट गळाच पकडला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, वाचा ताजे दर

  “शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार भाजपच्या संपर्कात”

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”

 लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय