“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”

मंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ईडी विनाकारण त्रास देत असल्यामुळे पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

उद्या सायंकाळी 4 वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. तेथे संजय राऊत उपस्थित राहणार असून शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, आमदार, उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेना आणि ठाकरे परिवारावर जी दादागिरी चालू आहे. खोट्या आरोपांचा चिखल उडवला जातोय अशा सर्वांना चांगलंच उत्तर देणार आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल होतं.

यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊतांच्या आणि शिवसेनेच्या पत्रकार परिषदेचे स्वागत आहे. चोख उत्तर देण्याची हिंमत संजय राऊत यांच्यात नाही. त्यांचे प्रविण राऊतांसोबत चांगले संबंध आहेत. प्रविण राऊत आणि सुजीत पाटकर यांचे संबंध काय आहेत?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पाटकरच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं तेव्हा शिवसेना नेत्यांवर कारवाई का झाली नाही?, असे अनेक प्रश्न त्यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांमध्ये कोणत्याही प्रश्नाच उत्तर देण्याची हिंमत नाही. पण त्यांना खोट्यासारखी नाटकं करायला चांगलंच जमतं. पण कोणत्याही विषयावरून लक्ष भटकवायला ते सतत प्रयत्न करत असतात. अशी जोरदार टीका सोमय्यांनी केली आहे.

दरम्यान, राऊत साहेब तुरंगात अनिल देशमुखांच्या शेजारची खोली मोकळीच आहे, असा म्हणत सोमय्यांनी संजय राऊतांना थेट इशाराच दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जारी, वाचा काय आहेत निर्बंध

कुडाळमध्ये शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा, पोलीस घटनास्थळी दाखल

Valentine’s Day | ‘तु माझा आहेस’; मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो

 “काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत”

‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ