मुंबई | दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दसरा मेळावा कोणी घ्यावा, यावरुन सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेनेत वाद सुरु आहे. दोनही गटांनी महानगरपालिकेला अर्ज दिला आहे.
पण पालिका मात्र तटस्थ भूमिकेत असून त्यांनी अद्याप कोणालाही परवानगी दिली नाही. किंबहूना पालिका कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
यावर आता शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. काल राऊतांची न्यायालयीन कोठडी संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांना संवाद साधला.
न्यायालयात राऊतांचे बंधू विनायक राऊत, आणि वकील होते. यासोबत न्यायालयात शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यावेळी राऊतांनी दसरा मेळाव्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होतो. ही शिवसेनेची परंपरा आहे. त्यामुळे जर का मैदान मिळाले नाही, तर शिवसैनिकांनी शिवाजी पार्कमध्येच मेळावा घ्यावा, असे राऊतांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकूण चाळीस आमदार आणि 12 खासदारांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला असल्याने या वादाला सुरुवात झाली आहे.
शिंदे यांच्या गटाने पर्यायी मैदान म्हणून वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सचे बीकेसी (BKC) मैदान मिळविण्यासाठी अर्ज केला होता. आणि ते त्यांना मिळाले देखील आहे, त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा राजकीय वातावरण तापविणारा ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
ममता बॅनर्जींची मोठे वक्तव्य; केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर पंतप्रधान मोदी करत नाहीत, तर भाजप…
“5 सप्टेंबरला अग्रवाल मोदींना भेटले आणि…” रोहीत पवार यांचे वेदांतावर मोठे वक्तव्य
आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त दोन-अडीच…
‘दारुच्या नशेत असल्याने…’; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप