कोेल्हापूर | राज्यात भाजप आणि शिवसेनेची मुख्यमंत्री पदावरून युती तुटल्यापासून जोरदार संघर्ष सुरू आहे. भाजप आणि शिवसेना नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर जोरदार फटकेबाजी केली आहे.
‘संजय राऊत रोज काही ना काही बोलत असतात, बोलून बोलून दमतात, आता त्यांना बॉर्नविटा पिण्याची गरज’, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील आज कोल्हापूरात बोलत होते.
संजय राऊत दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यात बोलण्याची स्पर्धा सुरू आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानदुखीच्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रूग्णालयात भरती झाले आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांना सरकारी रूग्णालय का चालत नाहीत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासगी रूग्णालयात भरती होतात याचाचं अर्थ राज्यातील रूग्णालये सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मला वैयक्तिक टीका करायची नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दाखला दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस कोरोना झाला होता तेव्हा ते सरकारी रूग्णालयात दाखल झाले होते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, एएनआयनं नवाब मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवाब मलिकांनी ‘आ बैल मुझे मार’ असं सुरू केलं आहे, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत: खोदत आहेत. ते स्वत:च खड्यात पडत आहेत, असं म्हणतानाचं देवेंद्र फडणवीस यांनी एकच पत्ता बाहेर काढला आहे आता देवेंद्र फडणवीस आणखी पत्ते बाहेर काढतील, असा धमकीवजा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय, पण भाजप कार्यकर्ते जाऊ देत नाहीत”
हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून नवा वाद
“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”
फडणवीस म्हणाले ‘डुकराच्या नादी लागायचं नाही’, आता नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर
‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा