‘राष्ट्रपती लागवट लागू करा’ असं म्हणाऱ्यांवर संजय राऊत बरसले, म्हणाले…

मुंबई |  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फो.टके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अ.टक करण्यात आली. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये चांगलीच आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे.

मनसुख हिरेन मृ.त्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका सं.शयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या र.डारवर होते. त्यांच्या अ.टकेनंतर भाजप नेते जास्तच आक्रमक झाले असल्याचं दिसतं आहे. विरोधकांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांकडून वारंवार केली जात आहे.

त्याचप्रमाणे भाजप पक्षाकडून राज्यातील सरकार बरखास्त करण्याचीही मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेने खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी याबाबतची भूमिका स्पष्ट करत भाजप आणि केंद्र सरकारवर ह.ल्लाबोल केला आहे.

केंद्रीय एजन्सींचा हस्तक्षेप राज्य सरकारमध्ये वाढला आहे. राज्य सरकारच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या केंद्र सरकारलाच बरखास्त करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच अनिल देशमुख यांचे काय होणार, हा महाराष्ट्रासमोरील महत्वाचा प्रश्न नसून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक आ.रोपाला महत्व देण्याची गरज नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला राज्यापाल राजभवनात बसून वेगळेच उपदव्याप करत आहेत. तर दूसरीऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. एखाद्या भागात जर चार कोंबड्या आणि दोन कावळे शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकेल, असं एकंदरीत दिसत असतं आहे.

दरम्यान, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहिलं आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , संजय राऊत ह उपस्थित होते.

तसेच या लेटरबॉम्बमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे विरोधकांना आता परमबीर सिंह प्रिय वाटू लागले आहेत, असंही शिवसेनाच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे जोडप्यानं आपल्या शेजाऱ्यांना…

‘काँग्रेसनं महाविकास आघाडीतील आपलं समर्थन काढून…

आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा…

जुलियो रिबेरोंनी शरद पवारांचा ‘हा’ प्रस्ताव…

सेकंड हँड कार घेताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या…