महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार; संजय राऊतांना विश्वास

मुंबई | महाराष्ट्रानंतर आता शिवसेनेनं ‘मिशन गोवा’ सुरु केल्याचं दिसतंय. कारण महाराष्ट्रापाठोपाठ आता गोव्यातही राजकीय भूकंप होणार, असं मोठं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

गोवा फाॅरवर्ड ब्लाॅक पक्ष आता आमच्यासोबत आहे. विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे गोव्यातील भाजपचं सरकार जाऊन तेथे चमत्कार झालेला पाहायला मिळेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा होऊ लागल्या आहेत.

आम्ही आता गोव्यामध्ये व्यस्त आहोत. गोव्यात आम्ही नवी आघाडी करणार आहात. भाजपला सत्तेतून दूर करणं हे आमचं लक्ष्य असल्याचं ते म्हणाले आहेत. गोवा फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षासोबत आम्ही आघाडी करणार आहोत, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेती युती होती. मात्र शिवसेनेनं वेगळा निर्णय घेत भाजपविरोधी सरकार बनवलं आहे. त्यामुळे गोळ्यातही विरोधी सरकार स्थापन झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-