Top news महाराष्ट्र मुंबई

काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा- संजय राऊत

मुंबई |  काश्मिरमधील शहीदांच्या कुटुंबावरही कुणीतरी फुले उधळा, असं शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. सोमवारी काश्मिरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखातून दीर्भ भाष्य केलं आहे.

कोरोना योद्ध्यांवर हिंदुस्थानी लष्कर आकाशातून फुलांची उधळण करीत असताना कश्मीरची जमीन कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांच्या रक्ताने भिजली आहे. हे चित्र चांगले नाही. या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो! त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या असं शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून म्हटलं आहे.

काश्मीरमध्ये शहीद होणार्‍या जवानांना श्रद्धांजल्या वाहून आणि उसासे सोडून काय होणार. हंदवाडाच्या लष्करी तळावर कर्नल शर्मा यांच्यासह पाच वीर जवानांचे मृतदेह तिरंग्यात गुंडाळून ठेवले. हे छायाचित्र प्रत्येक देशवासीयाला वेदना देणारे आहे. जय हिंदचा नारा घशातच गुदमरून टाकणारे हे दृष्य आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

सारा देश कोरोनाशी युद्ध लढत आहे व हे युद्ध आणखी किती काळ चालेल ते सांगता येत नाही. या गडबडीत प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चालले आहे? त्याकडे आपला कानाडोळा झाला आहे. हा कानाडोळा शनिवारी बहुधा सैल झाला असावा. कश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती आणि हल्ले वाढले आहेत. उत्तर कश्मीरमधील हंदवाडा क्षेत्रात शनिवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यात हिंदुस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवानांचे बलिदान झाले असून हा सर्व प्रकार धक्कादायक आहे, अशी राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“हिंदू मुस्लिम राजकारण करणाऱ्यांनी कालच्या हल्ल्यातलं इन्स्पेक्टर काझी यांचं बलिदान विसरू नये”

-“मोदी सरकार अपयशी; मात्र जनतेला पटवून देण्यात आम्हाला यश आलं नाही”

-उ. प्रदेश सरकारची तिजोरी मालामाल; एका दिवसात तब्बल एवढ्या कोटींची मद्यविक्री

-विश्वास नांगरे पाटलांचे नाशकात वाईन शॉप बंद करण्याचे आदेश…

-मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा शांतारामबापू कुंजीर यांचे निधन