मुंबई | काही दिवसांपासून राम मंदिर आणि आर्थिक मंदी यावर भाष्य करणारं एक व्यंगचित्र व्हायरल होतंय. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही टिप्पणी केली आहे. व्वा क्या बात है, असं म्हणत त्यांनी हे व्यंगचित्र आपल्या ट्वीटरवर पोस्ट केलं आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटमधल्या व्यंगचित्रात मंदिर वही बनायेंगेमधल्या र घसरून तिथून चाललेल्या गाडीवर पडताना दिसत आहे. देशातली सध्याची आर्थिक स्थिती आणि राम मंदिराचा मुद्दा एकाच व्यंगचित्रात दाखवण्याचं कसब या व्यंगचित्रकाराने पेललं आहे.
निवडणुका आल्या की हिंदूंच्या आस्मितेचा मुद्दा राम मंदिर चर्चेत येतोशिवसेना कायमच सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका बजावत असते. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपला टोकत असते. त्याचाच प्रत्यय आजही आला.
राम मंदिरावर बोलणारे अनेक वाचाळवीर भाजपत आहेत. त्यांच्या तोंडाला कुलूपं घातली तर राम मंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
देशात रोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. पण देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यावर नक्की तोडगा काढतील असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला गेला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्वीट-
ववा व्वा क्या बात है pic.twitter.com/03oCAaYKBx
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 21, 2019
महत्वाच्या बातम्या-
धाकधूक वाढली… भाजप विद्यमान 25 आमदारांचं तिकीट कापणार?? https://t.co/LCFPCA3lC9 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
नाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा- शरद पवारhttps://t.co/W7yGRvfqNL @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
“वाघ दरवाजातून 144 जागा मागतोय… भाजप म्हणतंय फेकलेला तुकडा घ्या” https://t.co/HcCEoBwLj8 @kolhe_amol @Shivsena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019