“सरकारच्या कामावर शरद पवार समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”

मुंबई |   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सरकारच्या कामावर समाधानी असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

सरकारच्या कामाविषयी ते समाधानी आहेत. परंतू लाॅकडाऊनमुळे जनता त्रस्त असल्याने ते चिंतेत आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अदभुत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

संजय राऊत आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “देशाचे नेते श्री. शरद पवार यांच्याशी आज अनेक विषयावर चर्चा झाली. सरकारच्या कामा विषयी ते समाधानी आहेत. लाॅकडाऊन मुळे जनता त्रस्त असल्याने ते चिंतेत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातली माहिती ते मिळवत आहेत. सुचना देत आहेत. राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अदभुत आहे.”

केंद्राने लॉकडाऊन 4 ची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने देखील आज 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. रेड झोनमध्ये कोणतीही शिथीलता करण्यात येणार नाही. मात्र ग्रीन झोनमध्ये आणि ऑरेंज झोनमध्ये हळूहळू व्यवहार आणि उद्योग सुरू करण्यात येतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर

-निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…

-महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे

-पृथ्वीराज बाबांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाण्यापासून कोण रोखतंय बघतेच- तृप्ती देसाई

-ग्रीन झोन असलेल्या बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव; पाहा कोरोना कुठून कसा आला…