मुंबई | आमची युती आहे. युतीत वेगळी काय वेगळी भूमिका असणार? उदयनराजे नुकतेच भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढू द्या. निकाल लागू द्या. 2024 ला परत जागा वाटप होईल त्यावेळी साताऱ्याच्या बदल्यात काय घ्यायचं ते बघू, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.
युतीत साताऱ्याची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून ती जागा सेना-भाजपसाठी सोडणार का? असा प्रश्न होता. संजय राऊतांनी आज त्याला उत्तर दिलं आहे.
उदयनराजे राष्ट्रवादीत असताना शिवसेना त्यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करत होती. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाने शिवसेनाचा त्यांना पाठिंबा आहे. तर राष्ट्रवादी त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होईल तर 24 ऑक्टोबरला निकाल लागेल.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
दहशतवाद्यांना आम्हीच प्रशिक्षण दिलं- इम्रान खान – https://t.co/ZTlzpTYbdb @ImranKhanPTI
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाने युतीबाबतचा संभ्रम कायमhttps://t.co/uoBbFDsM7U @Dev_Fadnavis @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019
‘या’ कारणामुळे मिलिंद देवरांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक https://t.co/dy7a05MxnY @milinddeora @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 24, 2019