समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; संजय राऊतांचा दावा

मुंबई | गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या जागावाटपाच्या चर्चेत समान जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

युतीत सन्मानाची वागणूक मिळाली नाही. 50 टक्के-50 टक्के जागा मिळाल्या नाही तर युती होणार नाही, असं शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी म्हटलं होतं त्याला संजय राऊतांनी पाठिंबा दिला आहे. 

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून युतीचा फॉर्मुला ठरला आहे. त्यामुळे रावतेंच्या म्हणण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, असं म्हणत राऊत यांनी युतीबाबतच्या उलटसुलट चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

युती होणारच असा विश्वास सेना-भाजपचे नेते वारंवार व्यक्त करत आहेत. त्याला आता संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपआपल्या परीने स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी करत आहेत, अशी माहिती आहे. 

महत्वाच्या बातम्या-