मुंबई | राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होती.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राडा पाहायला मिळत होता. पण मुंबईत पहिल्यांदाच झालेलं पाच दिवसीय अधिवेशन अखेर पार पडलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्येतीच्या कारणामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली नाही. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार पाडली.
अजित पवारांनी त्यांची ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली, अशा भाषेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे.
अधिवेशनकाळात विधानसभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती. त्यांनी टोले देत, टोले घेत ही जबाबदारी निभावली, अशी प्रशंसा संजय राऊत यांनी केली आहे.
‘अजित दादांनी दोन लगावले, चार घेतले पण एकूणच अधिवेशन व्यवस्थित पार पाडले’, असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
संजय राऊत हे मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बोलतना राऊतांनी उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीबद्दल देखील माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत आहे. मात्र, त्यांना सध्या काही निर्बंध आणि पथ्य पाळावी लागत असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तर हे निर्बंध लवकरच दूर होतील आणि मुख्यमंत्री पुन्हा कामाला लागतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कोरोना काळातही मुख्यमंत्र्यांनी घरी बसून संपूर्ण परिस्थिती हाताळली होती. तेव्हा मंत्री देखील मंत्रालयात जात नव्हते, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे,
महत्वाच्या बातम्या-
जगाचं टेन्शन वाढलं, Omicron बाबत WHO नं दिला ‘हा ‘गंभीर इशारा
काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर