“फडणवीस साहेबांचा ‘ब्ल्यू आईड बॅाय’, तो फडणवीसांना डुबवणार”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेची सुरूवात करताच संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल करायला सुरूवात केली आहे. या पत्रकार परिषदेला अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.

मोहित कंबोज हा फडणवीसांचा हा फ्रंटमॅन आहे. तो ब्लू आईड बॉय आहे. तो फडणवीसांना एक दिवस बुडवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

जो गरजते है, वो बरसते नहीं. ज्यांना काही करायचं असतं ते रोज सकाळी 9 वाजता टीव्हीवर येऊन सलीम जावेद यांची स्टोरी पाहत नाहीत. तुम्हाला काय करायचं ते करा. शासन, प्रशासन दोन्ही तुमच्याकडेच आहे. तुम्ही आत्ताच नाही गेल्या दोन वर्षापासून दुरूपयोग करत आहात, असंही राऊत म्हणाले आहेत.

पत्राचाळीचा जो मुद्दा आहे, ती जमीन खरेदी करणारा कंबोजच असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. कंबोज बायो फार्मिग प्रायव्हेट लिमिटेड, केबीजी हॉटेल, काळभैरव अशा अनेक कंपन्या चालवतो, असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, मोहित कंबोज हे मुंबई भाजपचे पदाधिकारी आहेत. सीबीआई आणि आर्थिक अपराध विरोधात मोहित कंबोज यांची चौकशी सुरू आहे. मोहित कंबोज हे 2016 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पार्टीचे मुंबई युवा शाखेचे अध्यक्ष होते.

महत्वाच्या बातम्या- 

“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

“सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर…”; संजय राऊत यांचा भाजपला मोठा इशारा

“तो जो कोण बोलतोय दलाल, ज्याला मराठीत भडवा म्हणतात”

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ