मुंबई : शनिवारी महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठराव पार पडला. यात ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव 169 विरुद्ध शून्य मतांनी जिंकला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे सुरुवातीपासून 170 आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत होते. त्यामुळे त्यांचं भाकित खरं ठरलं आहे.
विश्वासदर्शक ठरावात महाविकास आघाडीच्या बाजूनं 169 मतं पडली असली तरी आमच्याकडे 170 आमदारांचं पाठबळ आहे. कारण दिलीप वळसे पाटील यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ते मतदान करु शकले नाहीत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत सुरुवातीपासून महाविकास आघाडीच्या बाजूने 170 आमदार असल्याचं ठासून सांगत होते. त्यामुळे एका अर्थाने त्यांचा हा आकडा खरा ठरला. अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांनी आघाडीच्या बाजूने मत दिलं.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना सभागृहात मतदान करण्याचा हक्क नसतो. मात्र, जर एखाद्या ठरावाच्या बाजूने समसमान मतं पडली तर विधानसभा अध्यक्ष निर्णायक मत देऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
“पुन्हा येण्याची अती घाई फडणवीसांना नडली” – https://t.co/NZYtUZlnBI @rautsanjay61 @Dev_Fadnavis @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेत आले, भाजपने दिलदारपणा दाखवायला हवा होता” – https://t.co/svb30tzREA @AjitPawarSpeaks @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“…म्हणून मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला” – https://t.co/7lDcVWMzyG @rajupatilmanase @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019