Top news महाराष्ट्र मुंबई

बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

मुंबई |  कोरोनाशी झुंजत असतानाच सर्वनाश करणारे अम्फान हे चक्रीवादळ पश्चिम बंगालवर आदळले. या भयंकर प्रलयात जे नुकसान झाले, ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनीच पश्चिम बंगालच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. प्राथमिक माहितीनुसार बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?, असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशात अम्फान चक्रीवादळाने अतोनात नुकसान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्या भागाची हवाई पाहणी दौरा केला. त्यानंतर मोदींनी पश्चिम बंगालला तात्काळ 1 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मात्र ही मदत तोकडी असल्याची टीका बंगालच्या मुख्यमंत्री ममतांनी केल्यानंतर राऊत यांनी हाच मुद्दा रेटत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींना काही सवाल केले आहेत.

बंगाल पुन्हा आपल्या पायावर ताठपणे उभा राहील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पण 1 लाख कोटींचे नुकसान झाले असताना अवघ्या 1 हजार कोटींच्या मदतीवर बंगाल कसा उभा राहील, हा प्रश्नच आहे, असा सवाल करत राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला.

अम्फान चक्रीवादळाने आलेल्या आपत्तीमध्ये पश्चिम बंगाल एकाकी लढतोय, असे चित्र उभे राहणे योग्य नाही. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनीच पश्चिम बंगालच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. संपूर्ण देश या संकटकाळात पश्चिम बंगालच्या सोबत आहे, असा संदेश देण्याची ही वेळ आहे, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अम्फान चक्रीवादळामुळे जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकार करेल, असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…

-रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती

-सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांची हजेरी

-आजचं आंदोलन भाजपच्या अंगलट?; सोशल मीडियावर #महाराष्ट्रद्रोहीBJP ट्रेंड

-पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण