“महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामागे शरद पवारांचं मोठं योगदान”

मुंबई : गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. शनिवारी महाविकास आघाडीचा बहुमत चाचणीत विजय झाला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं महत्त्वाचं योगदान आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते पत्रकारांनी बोलत होते.

आम्ही जितका दावा केला होता तितक्याच आमदारांनी काल ठाकरे सरकारला पाठिंबा दिला आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे नक्की टिकेल. तसेच भाजपने असाच विरोध कायम ठेवला तर त्यांची प्रतिमा धुळीस मुळेल, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, काल महाविकास आघाडीची बहुमत चाचणी झाली. यात आघाडी सरकारच्या बाजून 169 मतं पडली तर विरोधात एकही मत गेलं नाही. कारण भाजपने सभात्याग केला होता. तर 4 आमदार तटस्थ राहिले.

महत्त्वाच्या बातम्या-