…म्हणून देशाने राहुल गांधी यांचे आभार मानायलाच हवेत; शिवसेनेचं ‘रोखठोक’ मत

मुंबई |  काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहुल गांधी कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या कठीण काळात अनेक तज्ज्ञांशी संवाद साधून विविध उपाययोजनेसंबंधी विवेचन करत आहेत. त्यांच्या याच कार्याची वाह वाह शिवसेनेने केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या टाळेबंदीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकांना बोलते केले. त्यामुळे देशाने राहुल गांधी यांचे आभार मानायलाच हवेत, असं रोखठोक मत संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मांडलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी मोदी सरकारचा जोरदार समाचार घेतला आहे.

राहुल गांधी-राजवी बजाज यांच्या संभाषणावर भाजपने टीका करत बजाज हे काँग्रेसधार्जिणे असल्याची टीका केली होती. भाजपच्या याच टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्राचा व समाजाचा विचार करणाऱ्या मोजक्या उद्योग घराण्यांचे बजाज हे प्रतिनिधी आहेत. राजीव बजाज यांचे पिताश्री राहुल बजाज हे तोंडफाट सत्य बोलण्याबद्दल प्रख्यात आहेत. चमचेगिरीशी त्यांचा कधी संबंध आल्याची नोंद नाही. त्यामुळे देशाच्या कठीण काळात बजाज काय म्हणाले, याला महत्त्व आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

72 दिवसांच्या लॉकडाऊनचा पंचनामा काही प्रमुख मंडळींनी सुरू केला आहे. लॉक डाऊन अचानक लादले. त्याबाबत कोणतेही नियोजन नव्हते, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आधीच सांगितले. राहुल गांधी यांनीही नेमके तेच सांगितले व आता राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत उद्योगपती राजीव बजाज यांच्याशी जी खुली चर्चा केली त्यातून लॉक डाऊननंतरच्या अर्थव्यवस्थेचा भयंकर चेहरा समोर आला आहे, असं राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ बड्या नेत्याने ट्विटरवरून भाजप हटवले, पक्षामध्ये एकच खळबळ

-शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्र्यांचं शिवाजीराजांना वंदन

-पुणे महापौरांच्या पाठीवर चंद्रकांतदादांची कौतुकाची थाप तर अजित पवारांना मात्र झिरो मार्क

-राज्यात आज 2436 जणांना कोरोनाची लागण; पाहा तुमच्या भागात किती?

-भारतात कोरोनामुळे गेल्या चार दिवसात झालेल्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक