“हे जर असंच सुरू राहिलं तर कामगार कपातीप्रमाणे मंत्रीकपात करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”

मुंबई |  जगाचे सगळेच संदर्भ आता बदलले आहेत. आपल्या देशातील परिस्थितीही दुर्दैवी आहे. हे असंच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमध्ये व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्राचे सर्वच मंत्री आज आपल्या जिल्हय़ांत ‘कोरोना’ लढाईत जुंपले आणि गुंतले आहेत. अनेक मंत्र्यांनी तीन महिने मुंबईचे तोंड पाहिलेले नाही. शपथा घेतल्या, पण मंत्रीपदाची चमक आणि धमक मिरवायची सोय नाही अशी त्यांची सध्याची अवस्था आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

जे मलईदार खात्यांसाठी भांडत होते ते अशी खाती मिळूनही रिकामेच आहेत. मंत्रालय, सरकारी कचेऱ्यांतील शांतता एक प्रकारची हतबलताच दाखवीत आहे. हे असेच राहिले तर कामगार कपातीप्रमाणे ‘मंत्रीकपात’ करण्याची नक्की वेळ येईल, असं भाकित त्यांनी केलं आहे.

‘कोरोना’ संकटाने जगाचे संदर्भ बदलत चालले आहेत. जगात किमान 27 कोटी लोक अत्यंत गरीब होतील. त्यातील किमान 6 कोटी लोक हिंदुस्थानात असतील. राम मंदिर, हिंदुस्थान-पाकिस्तान, मुसलमान हे विषय मागे टाकून रोजगार व भूक यावर जे बोलतील तेच लोकांचे पुढारी होतील, असंही ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-PMPML च्या 2100 कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा पगार नाही

-राज्यात विमानसेवा सुरू होणार का?, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य

-राज्यात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार; शिक्षणमंत्र्यांचे संकेत

-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19 हजार 100 कोटी रूपये…!

-कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली गेली पाहिजेत; अजितदादांच्या प्रशासनाला सूचना