मुंबई | शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून देखील पाय-उतार व्हावं लागलं होतं. एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसेनेच्या प्रतिष्ठेला तडा गेला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका झाली. या बंडाच्या व सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली.
बंडखोरीनंतरची उद्धव ठाकरेंची ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊतांनी या मुलाखतीचा टीझर त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केला आहे.
45 सेकंदाच्या या टीझरवरून ही मुलाखत हल्लाबोल, आसूड आणि गौप्यस्फोटांनी परिपुर्ण असणार आहे. या मुलाखतीत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना काही रोखठोक प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळत आहे.
शिवसेनेतील बंड, पक्षाची आगामी वाटचाल असे काही प्रश्नही राऊतांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर सामनातील ही पहिली मुलाखत असल्याने सर्वांचं लक्ष या मुलाखतीकडे लागलं आहे.
धनुष्यबाण कोणाचा? शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहेत, असे काही थेट प्रश्न राऊतांनी विचारले आहेत.
दरम्यान, या टीझरमध्ये सूड, गोप्यस्फोट, हल्लाबोल असे काही शब्द ऐकायला येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सर्व प्रश्नांची काय उत्तरं देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ-
सामना
26 आणि 27 जुलै
उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत pic.twitter.com/UrzhfDvdx7— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ
“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये”
‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले
‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं
“राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीये”