मुंबई | उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही. महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं.
जे वैफल्य ग्रस्त असतात. निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते. भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे, अशी टीका राऊतांनी केलीये.
युतीची कसलीही चर्चा नाही. कुणाशीही चर्चा नाही. दबके आवाज वगैरे असं काही नसतं. आमच्याकडून कोणी परस्पर कमेंट करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. तो मूर्खपणा आहे. शिवसेना-भाजप युतीत आम्ही थोडंफार एकत्र होतो. एकत्र नांदलो. हे जे काही नातं होतं ते भाजपच्या आडमुठेपणामुळे संपलं आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त लोकं असतात, निराश मनाने राजकारण करणारे असतात, त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशा असते, असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.
2024मध्ये ज्या निवडणूक होणार आहेत, त्यातही दिल्लीतील चित्रं बदलून जाईल. त्यांनी महाराष्ट्र विसरून जावं आता. ठिक आहे 100 लोकं जिंकतील, 75 लोकं जिंकतील अजून काही करतील पण महाविकास आघाडी (mahavikas aghadi) हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज बाद झाला आहे. त्यावरूनही त्यांनी हल्ला चढवला. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पण तिकडे भाजप अडचणीत आहे. त्यामुळे ते आमच्या तक्रारीची दखल घेत नाही, असं त्यांनी म्हटलंय.
आयोग साधी सुनावणीही करत नाही. पुरावे समोर ठेवूनही सुनावणीला घ्यायला तयार नाही. मेरठ, मथुरास, बिजनौर, नोएडा उमेदवार गेले. ही मनमानी आणि हुकूमशाही आहे. निवडणूक आयोग गुलाम झाल्याचं लक्षण आहे, असा हल्ला त्यांनी चढवला आहे.
युतीत असतानाही आमच्या काही लोकांनी केल्या होत्या. अशा प्रकारची मनमानी आता चालणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 23 जानेवारीच्या भाषणात स्पष्ट संदेश आणि संकेत दिले आहेत. शिवसेनेकडून असं काही होऊ नये यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही घ्यावी. नगरपरिषदेत सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे- तुषार गांधी
भारतासाठी गुड न्यूज; कोरोनाबाबत ही महत्वाची माहिती समोर
‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’; विक्रम गोखले भडकले
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याचीही परवानगी देऊन टाका”