“या नाच्याने स्वतःच्या गालावर टोमॅटो सॉस फासलं अन्….”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. आता शिवसेनेनं पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांचा सडकून समाचार घेतला आहे. तसेच शिवसेनेनं फडणवीसांवर देखील टीकास्त्र सोडलंय. अग्रलेखात शिवसेनेनं सोमय्यांचा भाजपचा नाच्या अस्सा उल्लेख केलाय. आता यावरून हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या हा भाजपचा एक नाच्या आहे, पण या नाच्याचे सूत्रधार स्वतः फडणवीस आहेत हे आता स्पष्ट झालं. सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवा या नावाखाली पैसे जमवून अपहार केला, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

या नाच्याने स्वतःच्या गालावर टोमॅटो सॉस फासलं आणि शिवसैनिकांनी हल्ला केला म्हणून बोंब ठोकली. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नाटक घडलं, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

सोमय्यांवर दगड मारले त्यामुळे त्यांच्या गाडीची काच फुटली. ती काच त्यांच्या हनुवटीस लागली. त्यामुळे रक्त आलं नाही, तर टोमॅटो सॉस बाहेर आला. हा चमत्कारच म्हणायला हवा, असं म्हणत शिवसेनेनं सोमय्यांवर हल्लाबोल केलाय.

सोमय्यांच्या गालावरून टोमॅटो सॉस टपकल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे काय? यावर गृहमंत्री वळसे-पाटलांनी याचा तपास करण्यासाठी फडणवीसांच्याच अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमायला हरकत नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला डिवचलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात, पठ्ठ्या DJ वर नाचत बसला तोवर… 

‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय  

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’ 

“3 मे ला काही तरी घडणार असं वाटतं”, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“नवनीत राणांनी D गँगशी संबंधित…”; संजय राऊतांंचा मोठा गौप्यस्फोट