मुंबई | कोरोनाच्या संकट दूर झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे. ठाकरे सरकार जेवढा खिळखिळा करण्याचा प्रयत्न कराल तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल, असं शिवसेना नेते आणि खआदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला ठणकावून सांगितलं आहे.
पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीतला अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे. विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल, असं राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत याची प्रचिती सातत्याने येत आहे. विरोधकांनी अनेक अडथळे व अडचणी निर्माण केल्या तरीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे सरकार अडचणीत आणण्यासाठी राजकीय दाबदबावाचे जंतरमंतर करू पाहणारेच परागंदा झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास कोणताही धोका नाही (तसा तो कधीच नव्हता) आणि राज्यातील महाविकास आघाडीसही इजा पोहोचणार नाही. विरोधकांचे सगळे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र राज्य अस्थिर होऊ दिले नाही. रखडलेल्या विधान परिषद निवडणुका पार पाडून मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा करावा, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यावर दुसरे काय व्हायचे? त्यांचे मनसुबेही उधळले गेले आणि स्वप्नेही, अशा शब्दात राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शेतकऱ्यांना आधार द्या; आंतरराष्ट्रीय रेटिंग आपोआप सुधारेल – राहुल गांधी
-कवी मनाचा नेता अभिजीत बिचुकलेने लिहिलं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; पत्रात म्हणतो…
-…तर लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही; वाचा लग्नासाठीच्या महत्त्वाच्या सूचना
-लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही- अलाहाबाद उच्च न्यायालय
-आदित्य ठाकरेंना कुणीतरी प्रोटोकॉल सांगा, बालिश बुद्धी पुन्हा सिद्ध करून दाखवली- निलेश राणे